
भारत कवितके मुंबई कांदिवली
पश्चिम..
रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याचे पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी कळविले आहे.मराठे साम्राज्य उत्तरेत पसरुन अटकेपार झेंडा लावून दिल्ली तक्ता वर स्वामीत्व गाजवणारा भारतीय इतिहासात मुत्सद्दी, शूर, लढवय्या, शौर्य वान सुभेदार मल्हारराव होळकर यांना महत्वाचे स्थान आहे, सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म धनगर समाजात क्षत्रिय हाटकर कुटुंबात झाला.पुणे सातारा सिमेवरील निरा नदीच्या किनारी असलेल्या होळ मुरुम या गावी १६ मार्च १६९३ मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला.त्यांच्या वडीलांचे नाव खंडोजी असे होते, त्यांच्या मुलांचे नाव खंडेराव होते,तर सून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या चार पत्नी होत्या,गौतमाबाई,व्दारका बाई,बनाबाई,हरकूबाई अशी त्यांची नावे होती, मल्हारराव होळकर यांना सुभेदार ही पदवी दिली होती, मल्हारराव होळकर यांचा मृत्यू २० में १७६६ मध्ये आलमपूर तालुका लहार, जिल्हा भिंड मध्यप्रदेश येथे झाला.अशा या महान शूर लढवय्या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..
Discussion about this post