अमरावती येथील horizon टायपिंग अँड इन्स्टिट्यूट द्वारा यांचे संचालक लीना वासनिक गवणेर यांनी नुकत्याच आयोजित विदर्भ स्तरीय भव्य नृत्य स्पर्धा २०२४ पार पडली.
प्रतिनिधी अमरावती – सागर भोगे
नुपूर डान्स अकॅडमी च्या विद्यार्थिनी नीं बाजी मारली असून त्यांनी आपले श्रेय गुरू श्री प्रकाश मेश्राम यांना दिले आहे.या मधे प्रथम क्रमांक मायरा अडवाणी, द्वितीय क्रमांक टिषा अडकणे तर कौतुकास्पद पुरस्कार मायरा विद्वांस, आरोही भस्मे, आणि क्रिशा राजा यांनी पटकावला. एवढेच नसून ग्रुप डान्स मध्ये तिसरा क्रमांक सुद्धा नुपूर डान्स अकॅडमी मधील चीमकल्यानी पटकावला आहे. कर्गम हा नवीन सांस्कृतिक डान्स विद्यार्थ्यानी सादर केला असून प्रेक्षकांची मने जिंकली आहे.विद्यार्थ्यांचे व त्यांच्या गुरूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Discussion about this post