यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर

:- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नुकतेच येथील सुभाष वार्ड स्थित कार्यालयात पुसद तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.उद्घाटन काॅ.सुरेंद्र गडदे(जिल्हा उपाध्यक्ष,किसान सभा)यांनी केले,अध्यक्षस्थानी काॅ.डाॅ.खुर्शीद वजुद होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा सहसचिव काॅ.संजय भालेराव उपस्थित होते. अधिवेशनात तालुका सचिव अमोल गौरशेट्टीवार यांनी मागील तिन वर्षाचा संघटनात्मक रिपोर्ट मांडला,सभासद नोंदनीचा आढावा सांगीतला,शाखा बांधणीचा रिपोर्ट सादर केला. यावेळी 13 सदस्यीय तालुका काैंसिलची निवड करण्यात आली त्यामध्ये तालुका सचिव पदी कॉ. अमोल गवरशेट्टीवार यांची फेरनिवड करण्यात आली. तर सहसचिव पदी कॉ. साहेबराव राऊत , कॉ. डॉ. खुर्शीद वजुद व कॉ. निखिल टोपलेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी सुरेंद्र गडदे, नारायण मुनेश्वर, समाधान बळी, संतोष ठामकेदार, शेख इकबाल भाई, मुमताज खान, अरुणा नेमाडे, सुलोचना वाघमारे, कविता काजळे, विष्णु सरकटे, प्रल्हाद अग्रवाल यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कॉ. निखिल टोपलेवार यांनी केले.अधिवेशनाला तालुक्यातील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
Discussion about this post