इंदापूर तालुका प्रतिनिधी – संतोष मिंड
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या विराट सभेत दत्तात्रय भरणे म्हणाले की पाच वर्षात पाच हजार कोटी निधी आणला, एवढी कामे केली, कामे करताना कधीही जातीचा पातीचा विचार केला नाही कधीही लांबचा जवळचा, पक्षाचा विचार केला नाही कायमच लोकांची कामे कशी होतील याचा विचार केला, एवढे कष्ट केले रात्रंदिवस मरतोय, झटतोय, झगडतोय, कष्ट करतोय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, कधी कुटुंबाला वेळ दिला नाही पण कायमच इंदापूर तालुक्याच्या विकासाचा विचार केला आहे मला वाटले आता तरी चांगले दिवस येतील पण एवढा निधी आणूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यात काटे – काचा टाकण्याचे काम विरोधक मुद्दामहून करतात असे म्हणत आमदार भरणेनी भावूक होत अजित पवारांसमोर मनमोकळे केले.
आमदार भरणे म्हणाले की पूर्वीचा इंदापूर तालुका बघा आणि आत्ताचा इंदापूर तालुका बघा नीट विचार करा इंदापूर तालुक्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाच वर्षात 5000 कोटी रुपयांचा एवढा निधी आणला अरे 5000 कोटी कशाला म्हणतात याचा जरा नीट विचार करा एवढा निधी आणताना किती रात्रंदिवस कष्ट केले असेल, किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले ,कधी कुटुंबाला वेळ दिला नाही पण कायमच इंदापूर तालुक्याच्या विकासाचा विचार केला एवढं काम करूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये उठताना बसताना झोपताना काटे – काचा टाकण्याचे काम विरोधक मुद्दाहून करतात.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो त्यावेळी माझ्या भावना काय होत असतील, रात्री झोपताना किती त्रास होत असेल हे माझं मी भोगतोय रे बाबांनो असे वक्तव्य करत आपले मन अजित पवारांच्या उपस्थितीत मोकळे केले.
आमदार भरणे म्हणाले की दादा आमच्या तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे आता आम्हाला विकासासाठी निधी देऊ नका पण आमच्या इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवा असे म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित दादांना साकडे घातले.
Discussion about this post