“तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत बोमनवार विद्यालय प्रथम.. “
चामोर्शी –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने केवळराम हरडे महाविद्यालय चामोर्शी येथे २२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेत जा.कृ.बोमनवार विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी संघाला हरवून सुयश प्राप्त केले आहे . हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या विजेत्या संघात आयुष जुवारे ,संस्कार गुरुनुले ,अथर्व जूवारे ,नैतिक फाले, फरहान सय्यद, वनीप कांदो, जय सातपुते ,चैतन्य कोसरे, आदर्श सुरजागडे, अथर्व मूलकलवार, अर्णव ठाकूर, नयन अडपलवार यांचा समावेश आहे.
या संघाला शारीरिक शिक्षक प्रमोद भांडारकर, मनोज बोमनवार यांचे मार्गदर्शन लाभले .
विजेता संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष- सौ.छायाताई बोमनवार,सचिव – रविशंकर बोमनवार, संचालक मंडळ, प्रभारी प्राचार्य ईतेंद्र चांदेकर, वर्गशिक्षक मृणाल तुमपल्लीवार, पराग धात्रक , शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी कौतुक केले आहे.
Discussion about this post