पांढरकवडा आगाराला १८ लाखांचे उत्पन्न
ता. प्र. गणेश बेतवार
पांढरकवडा आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यांच्यासाठी एसटीने यंदा अधिक बसेसची सोय केली होती. २७ एसटी बसेसच्या माध्यमातून पांढरकवडा आगाराला १८ लाख ४३ हजार ६१० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
मागील आषाढीनिमित्त पंढरपूरला जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत बसेसची संख्या अधिक होती. प्रवाशांना अनेक सवलतीही लागू असल्यामुळे कमी खर्चात यंदा पंढरीच्या वारीचा आनंदही प्रवाशांनी अनुभवला. यंदा आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाच्या विविध आगारांमधून १० ते २१ जुलै या
वारकऱ्यांसाठी जागोजागी बस थांबे
१० ते २३ जुलैपर्यंत ग्रामीण फेऱ्या वगळता सलग १३ दिवस २७ एसटी बसेसने १०८ फेऱ्याा करून सुमारे ३८ हजार ६१४ किमी अंतर पार केले. यामधून पांढरकवडा आगारास सुमारे सहा हजार ५०२ प्रवाशांच्या माध्यमातून अवघ्या १३ दिवसात पांढरकवडा आगारास १८ लाख ४३ हजार ६१० रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. वारकऱ्यांना ठिकठिकाणी बस थांबा देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.कालावधीत जादा बसेस धावल्या.
आषाढी एकादशी बुधवारी पार पडली. या दिवसांमध्ये पांढरकवडा आगारातील जादा बसेसच्या एकूण १०८ फेऱ्या झाल्या. आषाढी वारीसाठी धावलेल्या जादा बसेसमधून सहा हजार ५०२ प्रवाशांच्या माध्यमातून अवघ्या १३ दिवसांत पांढरकवडा आगाराला १८ लाख ४३ हजार ६१० रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले.चालक-वाहक वाहतूक
नियंत्रकासह कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे आगारास अधिकचे उत्पन्न मिळाल्याचे आगार प्रमुख योगेश देशमुख यांनी सांगितले. नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून पांढरकवडा आगार ओळखले जाते.
मराठवाडा व आंध्र प्रदेशात व तेलंगाणा जाणाऱ्या प्रवाशांसाठी पांढरकवडा आगारात नेहमीच मोठी गर्दी असते.
पिकअप शेड प्रवाशांसाठी उभारले होती. तसेच वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र नियुक्ती करून सुरक्षित प्रवासाठी मदत केली होती. जेष्ठ नागरिक योजनेतून दोन हजार ३०० महिला सन्मान योजनेतून दोन हजार, तर अमृत योजनेतून दोन हजार २०० नागरिकांनी एसटी सवलतीच्या योजनेचा लाभ घेतला. आषाढी वारीच्या काळात एसटी बसमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व योजना राबवण्यात आल्या होत्या
Discussion about this post