टॉवर आहे नावाला ; नेटवर्क नाही गावाला..
लाडकी बहिण पुन्हा संकटात ;ऑनलाइन सेवा कोलमडली…
प्रतिनिधी / चेतन लोखंडे -..
सिल्लोड तालुक्यात भवन गावात मागील दोन तीन महिन्यांपासून इंटरनेट व कॉलिंग सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इंटरनेट अभावी ऑनलाइन सेवा कोलमडली असून ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भवन परिसरात मोबाइल नेटवर्क अभावी ग्राहकांना इतरांशी संपर्क साधण्यात कमालीची अडचण येत आहे. याचा परिणाम थेट मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर होत आहे लाडक्या बहिणींना नेटवर्क अभावी तासनतास ताटकळत उभे रहावे लागत आहे.अवकाळी वारे व पाऊस या अभावी मागील पाच-सहा दिवसांपासून महावितरणची लाईट दोन- तीन तास नसते. पण भवन येथील जिओ कंपनीचे टॉवरला पॉवर बॅकअपची कोणतीही व्यवस्था नाही. बॅटरी किंवा इन्व्हर्टर नसल्यामुळे वीज गेल्याबरोबर जिओला कंपनीचे नेटवर्क शून्य मिळत आहे. त्याचबरोबर इंटरनेट पूर्ण बंद पडून कमी नेटवर्क मुळे आवाज न येणे, कॉल मध्येच कट होणे, कॉल न लागणे, अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत असते. भवन परिसरात सर्वाधिक जास्त ग्राहक जिओचे कंपनीचे असताना देखील कंपनीकडून ग्राहकांचा विचार न करता अतिशय बेसुमार दर्जाची सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होेत आहे.
शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपलोड करण्यास खूप मोठी समस्या निर्माण होत आहे.शासनाने विविध प्रकारचे कामे ऑनलाइन केले असून इंटरनेट अभावी अनेक कामे खोळंबली आहेत. भवन गावाला १० ते १२ खेडे व गावं जोडलेली आहे.त्या गावांतील ग्रामस्थ शासकीय कामासाठी मोठ्या संख्येने लोक भवन येथे येतात. परंतु इंटरनेटअभावी विविध कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. भवन परिसरातील खासगी मोबाइल कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात जिओ कंपनीचे मनोरे (टॉवर) उभारले आहेत. मात्र, ते शोभेची वास्तू ठरली आहेत.
………………………………………………………………………
एका ऑनलाईन सेवा केंद्र चालकाने असे सांगितले की, जिओ टॉवरमध्ये बॅकअपची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारची व्यवस्था नसलेले कदाचीत हे एकमेव टॉवर असेल, अशी स्थानिकांचे मत आहे. बॅटरी बॅकअपची कागदोपत्री नोंद असावी, अशी शंकाही त्यांना आहे. बॅकअप बसवण्याचे काम केले गेल्याचे दर्शवून लाखोंची रक्कम लाटली गेली असावी, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची स्थानिकांची मागणी आहे

Discussion about this post