





भारत सरकारच्या स्वच्छता ही सेवा २०२४ या उपक्रमाला सुरुवात…
भारत सरकारची स्वायत संस्था नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर व शिवसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत बिडकीन गाव येथे स्वच्छता करण्यात आली.
जिल्हा युवा अधिकारी श्री. संकल्प शुक्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ साजरे केले जाणार आहे. या वर्षाची थीम स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ही आहे. या कार्यक्रमांतर्गत शिवसेवा बहुउद्देशीय संस्था ( SSBS ) स्वयंसेवकांना स्वच्छता विषयी शपथ देण्यात आली.
स्वच्छ भारत मिशनच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा उद्देश अधिकाधिक लोकसहभाग निर्माण करणे, स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या संकल्पनेला बळकटी देणे आणि राष्ट्रव्यापी मोहिमेद्वारे महात्मा गांधींच्या जयंती उत्सवाची समाप्ती करणे आहे.
उपक्रमांतर्गत गोळा केलेला सिंगल युज प्लास्टिक कचरा पुढील प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत बिडकीन ( घंटागाडी ) यांच्याकडे सुपूर्त केला.
या उपक्रमांतर्गत नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर व शिवसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज धुळे, गुड्डू पंडित, अष्टांग पंडित, संकेत मोरे, वैभव जाधव, अभिषेक काकडे, अजय कदम, अभिजीत जाधव, अभिषेक जाधव, विजय कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.
Discussion about this post