जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा
गावातील रस्ते झालेत चिखलमय, गुत्तेदार मात्र फरार
नांदेड प्रतिनिधी जल जीवन मिशनचे काम सुरू होऊनहि कार्यकाळ संपत आला तरीही काम मात्र अर्धवट झाल्यामुळे दोष कुणाला द्यावे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. टीव्हीवरची जाहिरात बघितली आणि जल जीवन मिशनचे काम सुरू झाले. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण दिसून आले. गावात चांगले रस्ते फोडून
पाईपलाईन केल्यामुळे शुद्ध पाणी प्यायला भेटणार अशी अपेक्षा गावकऱ्यांना वाटत होती, परंतु गावातील चांगले रस्ते खोदून पाईपलाईन करून गुत्तेदारच फरार झाल्याने गावात नळाला पाणी तर आलेच नाही मात्र गावातील मुख्य रस्ते खोदल्यामुळे जागो जागी खड्डे पडून गावात सर्वत्र चिखल झाला. जागोजागी पाणी साचले. त्यामुळे रस्त्यात घाणीचे साम्राज्य झाल्याने मच्छरचे प्रमाण
वाढले याचा दुष्परिणाम होऊन गावातील नागरिक बिमार पडत आहेत . सदरील कामाचे फलक हे बिले काढण्यापुरतेच तयार केले आहेत कि काय ? आजून बऱ्याच ठिकाणी जल कुंभाच्या कामाला सुरुवातही केलेली नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी व गुत्तेदारास ताकीद देऊन उर्वरित काम तात्काळ करण्याच्या सूचना द्याव्यात अशी चर्चा सर्वत्र ठिकाणी नागरिकातून होताना दिसत आहे.
Discussion about this post