साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मध्ये घडतोय बाल वैज्ञानिक….
प्रतिनिधी :- दरिकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्यूज
वृत्तसेवा :- येथील साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड तालुका, शिरोळ, जिल्हा, कोल्हापूर या विद्यालयाचा नवोदित बाल वैज्ञानिक घडत आहे. साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड चा इयत्ता 9 वी मध्ये शिकणारा हुशार विद्यार्थी कुमार सुजय सुनीलकुमार दानोळे याने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये दोन टप्प्याच्या अतिशय अवघड लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये धवल यश संपादन केले आहे .
त्याची मुंबई येथे होणाऱ्या Selection for final stage (Action Research Project) या पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याला त्याचे आई व वडील सौ व श्री डॉ.सुनीलकुमार दानोळे तसेच श्री.शोएब जमादार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
त्याला साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री, रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील, संस्थेचे सचिव श्री अजित पाटील, सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.
सुजयच्या या यशाचे सर्व परिसरात कौतुक होत आहे.त्याला पुढील टप्प्यासाठी हार्दिक – हार्दिक शुभेच्छा!!!.💐💐💐









