• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

by
February 19, 2026
in Blog
0
आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

आजरा : प्रतिनिधी,
आजरा हायस्कूल, आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजनाने झाली. हे पूजन मुख्याध्यापक श्री. अजित तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ. विद्या हरेर यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट, शौर्य आणि पराक्रम विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला. शिवरायांनी दाखवलेली एकता, शौर्य व नीतिमत्ता हीच खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत, पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✅शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शिवविचारांचा संदेश

आजरा हायस्कूल, आजरा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात विविध वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शिवविचारांचे महत्व पटवून दिले.
सौ. संजीवनी कुराडे यांनी “रयतेचा राजा कसा असावा” याचे उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून स्पष्ट केले. तर सौ. मनीषा कांबळे यांनी धैर्य, संयम व न्याय ही शिवरायांची शिकवण जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. विद्या हरेर यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

✅आजरा हायस्कूलच्या रिया पारपोलकरने साकारली ‘हिरकणी’

मराठा महासंघ आजरा यांच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात शिवतीर्थ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी रिया संतोष पारपोलकर हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे साकारली. तिच्या या अभिनयासाठी शाळेतील शिक्षक श्री. व्ही. ए. पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले.
उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रियाला आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष श्री. बंडोपंत चव्हाण, श्री. मारुती मोरे, श्री. संभाजी इंजल, सौ. ज्योत्सनाताई चराटी पाटील, श्री. राजू होलम यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

Previous Post

व्यसनापेक्षा आरोग्याला पसंती! मुक्ताईनगरमध्ये ‘आरंभ ग्रुप’तर्फे शेकडो नागरिकांना मसाला दूध वाटप

Next Post

🔴 🟠🔵 व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न 🔵🟠🔴

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
🔴 🟠🔵 व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न 🔵🟠🔴

🔴 🟠🔵 व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न 🔵🟠🔴

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In