मोरया गणेश उत्सव मंडळा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.…
प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड:-छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. त्या दिवशी शिवरायांना ‘शिवछत्रपती’ होण्याचा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे महाराजांना पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करुन भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात महाराजांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळाले. आजही महाराजांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अबाधित आहे.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी तथा तहसीलदार उदय गायकवाड यांनी केले.
येथील गिरी सिनेमा टॉकीज जवळील मोरया गणेश कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्ष स्थानी उद्योगपती जावेद सनदी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून येथील नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड व घोसरवाडचे सरकार भवानीसिंह घोरपडे होते.
यावेळी बोलताना उद्योगपती जावेद सनदी म्हणाले की, आजच्या तरुणांनी युगपुरुष छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम केल्यास आयुष्यातून त्यांच्या हातून कधी चुकीचे कार्य होणार नाही. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करण्यास खूप परिश्रम घेतले आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्यांनी स्वराज्य राखले. शिवचरित्र प्रत्येक युवकांनी वाचून समजून घेणे आज काळाची गरज आहे.
यावेळी घोसरवाडचे सरकार भवानीसिंह घोरपडे व येथील नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंकर मेंगे गुरुजी यांनी मानले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित देसाई, रामचंद्र मोहिते, अजय भोसले, मंडळाचे अध्यक्ष जीवन कोरवी, नंदकुमार सुतार, उदय साळुंखे, रघुनाथ माळी, शिवाजी जुगळे, बाबूसिंग रजपूत, बंडू उर्फ अनिल पाटील, सुधीर माळी, वैभव खंदारे, फकीराप्पा कोरवी, निल निटवे, दीपक चौगुले, श्रीधर चौगुले, सागर जुगळे, पुष्पा पाटील, सुवर्णा सुतार, नूतन नलवडे, कांचन मेंगे, स्नेहल जुगळे, निशा जुगळे, सुवर्णा सावंत, विद्या घोरपडे, शकुंतला जुगळे, उमा कोरवी, ज्योती कोरवी अमृता रजपूत, मंगल राजपूत व शिवप्रेमी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.









