• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न……

by
February 19, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न……
0
SHARES
97
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न……

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.

वृत्तसेवा:-कुरुंदवाड परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांची जयंती येथील शहरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजन्मकाळ सोहळा मिरवणुकीमुळे रस्ते शिवभक्तांनी शिवमय झाले होते. येथील शिवतीर्थावर नगराध्यक्षा सौ.मनीषा उदय डांगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय…. असा जयघोष करण्यात आला. येथील शहर व परिसरात शिवजयंतीचा कमालीचा उत्साह दिसून आला.

सकाळपासून चौकाचौकात शिव प्रतिमांचे, पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. फुलांनी, केळीच्या पानांनी सजवलेले मंडप, भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. प्रत्येक प्रभागात गल्लीबोळात ऐतिहासिक पोवाडे तसेच पुल्लिंग चेतवणारी गाणी ऐकवली जात होती. येथील नगरपालिकेच्या सभागृहात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे नगराध्यक्ष मनीषा उदय डांगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, श्रद्धा वळवाडे, राजेंद्र गवळी, नंदकुमार चौधरी, अजित दीपंकर, शशिकांत कडाळे, गिरीधर मधाळे आनंदा शिंदे निशिकांत ढाले, विनायक कांबळे, मोहन शिकलगार यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

येथील शिवतीर्थावर येथील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा उदय डांगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक रमेश भुजुगडे, पक्ष प्रतोद जवाहर पाटील, अक्षय आलासे, अनुप मधाळे, वैभव उगळे, तानाजी आलासे, दीपक परीट, बाळासाहेब गायकवाड, दयानंद मालवेकर, संगीता कर्नाळे, जय कडाळे, उदय डांगे यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापक किरण पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पर्यवेक्षक शरद तावदारे, शितल हळींगळे, विजय माळी या मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

येथील मराठा मंडळाच्या नवबाग रोड येथील कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व विद्यमान नगरसेवक वैभव उगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मिलिंद गोरे, संतोष नरके, आप्पासाहेब भोसले, आप्पासो गावडे, प्रतीक गायकवाड, युवराज गायकवाड, सागर परीट यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका विनया जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक श्रीकांत निकाळजे, ज्येष्ठ शिक्षक सदाशिव तिगणे, विश्वास पाटील, सतीश माने, बाबासाहेब भुजुगडे, राहुल जंगम, सच्चिदानंद जंगम, विजय शहापूरे, गजानन केरीपाळे, दत्तात्रय राजमाने, सुधाकर कांबळे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेरवाड रोड येथील मराठा मंडळाच्या कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड व दत्तवाडचे सरकार भवानीसिंह घोरपडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले .यावेळी रामचंद्र मोहिते, अजित देसाई, अजय भोसले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर या मान्यवरांसह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील दयावान तालीम येथे शिवजयंती उत्सव वातावरणात साजरी करण्यात आला. नगरसेवक अनुप मधाळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी रामदास माधाळे, गिरीधर मधाळे, स्वप्निल शितोळे या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठया उत्साहात संपन्न….

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठया उत्साहात संपन्न….

छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठया उत्साहात संपन्न....

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In