छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठया उत्साहात संपन्न….
प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड:- येथील साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड संचलित साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी कुरुंदवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्था संचालित साने गुरुजी विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पारंपरिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप शिवतीर्थ येथील सार्वजनिक शिवजयंती साठी उपस्थिती लावली.यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










