• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगली नगरीत शिवजन्मोत्सवाचा जागर; भव्य ‘मेगा पदयात्रे’ने रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

by
February 19, 2026
in देश विदेश
0
सांगली नगरीत शिवजन्मोत्सवाचा जागर; भव्य ‘मेगा पदयात्रे’ने रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि शिवप्रेमींच्या सहभागाने सांगली ‘शिवमय’; युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगलीत जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या वतीने अभूतपूर्व ‘मेगा पदयात्रा’ काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण सांगली नगरी शिवमय झाली होती. जिल्हा परिषद ते मारुती चौक या मार्गावर हजारो शिवप्रेमींनी चालत सहभाग नोंदवून शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदयात्रेत प्रत्यक्ष चालत सहभाग नोंदवून या सोहळ्याची रंगत वाढवली.पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके आकर्षणाचे केंद्र ठरली.तलवारबाजी व लाठी-काठी: चपळाईने केलेल्या या खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पारंपरिक लेझीमच्या तालावर आणि मल्लखांबावरील कसरतींनी शिवकालीन पराक्रमाची आठवण करून दिली.शाहिरांच्या पोवाड्यांनी वातावरणात वीररस भरला होता.पदयात्रेत अनेक चिमुकल्यांनी ‘बाल शिवबा’ आणि ‘राजमाता जिजाऊ’ यांची वेशभूषा साकारली होती. पारंपरिक फेटे आणि वेशभूषेतील नागरिक व विद्यार्थ्यांमुळे पदयात्रेला एक वेगळेच ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते.जिल्हा परिषद येथून निघालेली ही पदयात्रा राम मंदिर चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक मार्गे मार्गक्रमण करत मारुती चौक येथे पोहोचली. या ठिकाणी असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि या भव्य सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव,  अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठया उत्साहात संपन्न….

Next Post

🔴 अखिल भारतीय मराठा संघ–मराठा महासंघ, आजरा तर्फे 🔶 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा 🔶

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
🔴 अखिल भारतीय मराठा संघ–मराठा महासंघ, आजरा तर्फे 🔶 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा 🔶

🔴 अखिल भारतीय मराठा संघ–मराठा महासंघ, आजरा तर्फे 🔶 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा 🔶

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In