• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमधील सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट?

by
February 22, 2026
in सामाजिक
0
पनवेलमधील सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट?
0
SHARES
67
VIEWS
Ad 1

बेकायदेशीर टर्फवर कारवाईची पत्रकार मित्र असोसिएशनची मागणी

पनवेल (प्रतिनिधी):

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या मैदानांवर काही शाळा, महाविद्यालये व खाजगी संस्थांकडून बेकायदेशीररीत्या फुटबॉल व क्रिकेट टर्फ उभारून आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

या संदर्भात पत्रकार मित्र असोसिएशन चे अध्यक्ष केवल महाडिक यांनी पनवेल महानगरपालिका तसेच सिडको प्रशासनाला पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टर्फवर तासागणिक १५०० ते २५०० रुपये शुल्क आकारले जात असून, दिवसाला सुमारे १५,००० ते २५,००० रुपये आणि महिन्याला ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत अवैध कमाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदाने स्थानिक मुलं, युवक आणि खेळाडूंसाठी असताना, त्यावर फी आकारून प्रवेश दिला जात असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शेड किंवा टर्फ उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतलेल्या नसल्याचेही सांगितले जात आहे. शासनाला महसूल न देता हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील खेळाडूंना खेळाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण थांबवून स्थानिक खेळाडूंना मैदानांचा मुक्त व विनामूल्य वापर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करून सर्व बेकायदेशीर टर्फ हटवावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा एका महिन्यात ठोस कारवाई न झाल्यास शहरव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

बाभुळगाव येथे २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह; मृत्यू संशयास्पद, तपास सुरू

Next Post

जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी “प्रतिबंधक कक्ष” (Preventive Cell ) स्थापन.पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित केली विशेष यंत्रणा.*

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
15
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
सामाजिक

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

April 13, 2026
2
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post
जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी “प्रतिबंधक कक्ष” (Preventive Cell ) स्थापन.पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित केली विशेष यंत्रणा.*

जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी “प्रतिबंधक कक्ष” (Preventive Cell ) स्थापन.पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित केली विशेष यंत्रणा.*

ताज्या बातम्या

कन्नड-सोयगाव मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; आगामी रणनीतीवर चर्चा

कन्नड-सोयगाव मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; आगामी रणनीतीवर चर्चा

May 23, 2026
पिशोर उमाठा पांधी येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पिशोर उमाठा पांधी येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

May 23, 2026
शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

May 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In