मानवत / प्रतिनिधी.
शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान देणारे अनेक असतात, पण आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि कर्तृत्वाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार देणारे ‘आदर्श शिक्षक’ विरळच असतात श्री. विलास मिटकरी हे अशाच उपक्रमशील, सदाबहार आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाचे नाव आहे, ज्यांनी केवळ शाळाच नव्हे, तर समाजाच्या हृदयावरही आपली मोहोर उमटवली आहे. मिटकरी हे केवळ एक शिक्षक नसून सांस्कृतिक समृद्धीचे धनी आहेत असे प्रतिपादन विलास सत्वधर यांनी केले ते मिटकरी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्तर देताना म्हणाले भगवान शिवाचे निस्सीम भक्त असलेले अध्यात्मातील ‘शिव – तत्व’ आपल्या जगण्यातून प्रतिबिंबित करतात सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्यांचा स्वभाव त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळी उंची देतो त्यांच्या कामात शिस्त आहे, पण त्या सोबतच एक आपुलकीचा ओला वाही आहे आजच्या धावपळीच्या युगात निरोगी आयुष्याचा मंत्र देणारे ते एक उत्कृष्ट योग प्रशिक्षक आहेत विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेण्या ऐवजी, ते विविध ठिकाणी जाऊन योगाचे धडे देतात आणि ते ही पूर्णपणे निः शुल्क भारतीय योगविद्येचा प्रचार आणि प्रसार करून ते खऱ्या अर्थाने मातृ भूमीची सेवा करत आहेत ही निस्वार्थ वृत्ती त्यांच्यातील खऱ्या राष्ट्रभक्ताचे दर्शन घडवते सरांनी जिथे जिथे ज्ञानदानाचे कार्य केले मग ते झरी असो वा रुढी तिथे आज ही त्यांच्या नावाचा दरारा आणि प्रेम कायम आहे. त्यांनी केवळ विषय शिकवले नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत, हेच त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे यश आहे. केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित ही केले आहे. विलास मिटकरी म्हणजे उत्साहाचा झरा असून त्यांचं व्यक्तिमत्व सदाबहार आहे आणि बोलणं दिल खुलास समाजहित आणि विद्यार्थी हित जोपासणारा हा आदर्श शिक्षक खऱ्या अर्थाने समाजाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या कार्याचा हा आलेख असाच उंचावत राहावा असे विलास सत्वधर म्हणाले यावेळी त्यांना अभिष्टचिंतन सोहळ्याचा सदिच्छा देण्यात आल्या.











