• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगली मनपाच्या स्वच्छता दूतांसाठी ‘आरोग्य कवच’; मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

by
February 24, 2026
in देश विदेश
0
सांगली मनपाच्या स्वच्छता दूतांसाठी ‘आरोग्य कवच’; मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची डॉक्टरांकडून काळजी; आयुक्त सत्यम गांधी व महापौर धीरज सूर्यवंशी यांचा पुढाकार

सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर (UICC) तर्फे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सत्यम गांधी आणि उपायुक्त सौ. स्मृती पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.शहर स्वच्छतेचा डोलारा सांभाळणाऱ्या घंटागाडी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सक्षम राहावे, या उद्देशाने ‘क्षमता बांधणी’ (Capacity Building) कार्यक्रमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. या शिबिरात UICC च्या अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने कर्मचाऱ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. परमशेट्टी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. गांधी आणि डॉ. टकले यांनी सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सल्ला दिला. यावेळी बोलताना डॉ. परमशेट्टी म्हणाले की, “स्वच्छता कर्मचारी हा शहर आरोग्याचा खरा पाया आहे. हे कर्मचारी निरोगी राहिले तरच शहराची सेवा अधिक प्रभावी होईल. भविष्यातही मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने वैद्यकीय सेवा देण्यास आमची संस्था तत्पर राहील.”कार्यक्रमादरम्यान आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी एक महत्त्वाची सूचना मांडली. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासण्या आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्यांचा समावेश या सेवेमध्ये करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या टीमने या सूचनेचे स्वागत करत, भविष्यात या सर्व सेवा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. नूतन महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,
आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी हे शहर व्यवस्थेचा कणा आहेत. ते समाजाचा महत्त्वाचा आधार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हे कर्मचारी निरोगी राहिल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल.”याप्रसंगी  महापौर श्री. धीरज सूर्यवंशी, उपमहापौर श्री. गजानन मगदूम, सभागृह नेते श्री. संदीप आवटी तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि हॉस्पिटलचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! आता सर्व योजना एका क्लिकवर – तुकाराम मुंढेंचा देशात पहिलाच उपक्रम…

Next Post

नागपूर येथे चर्मकार समाज परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

नागपूर येथे चर्मकार समाज परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In