• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

by
February 24, 2026
in देश विदेश
0
राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी जतन केलेले पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मिरजमध्ये

कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता धर्माचा उपदेश देणारे आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रूढीच्या विरोधात जनजागृती करणारे कीर्तनकार, समाजसुधारक, राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील परीट गल्ली मधील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात आहेत. मिरज मधील या मंदिरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या मंदिरामध्ये नियमितपणे भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते.शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सागर वनखंडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, विनायक यादव, धनंजय कदम, महेश निकम,किशोर रसाळ, यशवंत यादव, अशोक शिंदे, अनिल नेमाडे, बजरंग नेमाडे, श्री पवार सर, सौ सुषमा सूर्यकांत निकम, सौ प्रतिमा यशवंत यादव, सौ उषा दत्तात्रय यादव, शारदा संजय जगते यांच्यासहित परिट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये महान कार्य केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अस आश्वासन शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन मोहन वनखंडे सर यांनी यावेळी दिले. तर सदर समाज मंदिरासाठी महापालिकेकडून सुद्धा योग्य ते सहकार्य केले जाईल असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले.
“देव दगडात नसून माणसांत आहे” हे सांगून राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, जातिभेद आणि प्राण्यांची हत्या नाकारली. त्यांनी साधे राहणे, चोरी न करणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचा (शिक्षण) मोलाचा संदेश दिला. संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

नागपूर येथे चर्मकार समाज परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

ताज्या बातम्या

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

May 25, 2026

अहिल्यानगरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

May 25, 2026

पोलिस मुख्यालयात स्मोक हॅन्डग्रेनेडचा स्फोट; चार जवान जखमी

May 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In