• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नर्सच्या अबोल्यामुळे डोंबिवलीच्या डॉक्टरचे टोकाचे पाऊल; 10 बिअर आणि 45 गोळ्यांचे सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न

by
February 25, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

ठाणे: डोंबिवली शहरात एका नामांकित डॉक्टरने प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःचे सुसज्ज हॉस्पिटल आणि सुखी संसार असताना, केवळ एका नर्सच्या प्रेमाखातर आणि तिने धरलेल्या अबोल्यामुळे हताश होऊन डॉक्टरने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

डोंबिवलीमधील एका प्रकरणाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सुखी संसाराला लागली नजर
या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे. मात्र, काही काळापासून या डॉक्टरांचे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्ससोबत प्रेमसंबंध जुळले होते. या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. वादाचे स्वरूप इतके वाढले की, डॉक्टरांनी आपल्या पत्नीचा आणि घराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. ते डोंबिवली पूर्वेकडील एका हायफाय सोसायटीत भाड्याने घर घेऊन स्वतंत्र राहू लागले.

लग्नाचा तगादा आणि टोकाचे पाऊल
घटनेला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी तगादा लावला. “माझे आधीच लग्न झाले आहे, मी तुझ्याशी पुन्हा लग्न कसे करू?” असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यावर संतापलेल्या नर्सने त्यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. ज्या नर्ससाठी सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवले, तिनेच आता पाठ फिरवल्याने डॉक्टर मानसिक तणावात गेले. याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी १० बिअर प्यायल्या आणि तब्बल ४५ झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

Previous Post

कामातून उत्तर द्या!-उदयसिंह राजपूत

Next Post

अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान उपक्रम

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
2
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post
अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान उपक्रम

अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान उपक्रम

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In