• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखेर करवाढीला स्थगिती

by
February 27, 2026
in देश विदेश
0
अखेर करवाढीला स्थगिती
0
SHARES
6
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

अखेर करवाढीला स्थगिती
परभणी प्रतिनिधी – रमेश मुलगीर
मानवत शहरातील अवाजवी करवाढीला अखेर लगाम बसला असून चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणीची प्रक्रिया स्थगित करण्याचा ऐतिहासिक ठराव नगरपरिषद स्तरावर मंजूर करण्यात आला आहे. प्रशासकीय काळात प्रशासकांमार्फत करण्यात आलेली चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असल्याचे निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित कार्यकारिणीने ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याचा आणि त्यात मूलभूत सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
यासंदर्भात शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष तथा डॉ. अंकुश बालाजी लाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटनेते) यांनी या विषयावर पुढाकार घेतला. तसेच व्यावसायिक मालमत्तांवरील दुप्पट कर आकारणी रद्द करून ती कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. वार्षिक भाडेमूल्य वास्तववादी पातळीवर कमी केले जाणार असल्याची माहिती डॉ. लाड यांनी ‘दैनिक देशोन्नती’शी बोलताना दिली.
मानवत नगरपरिषद हद्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप यादी व प्रशासकीय ठराव क्र. २९३ (दि. ६ फेब्रुवारी २०२५) हा शहरातील आर्थिक परिस्थितीशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०२६-२७ ते २०२९-३० या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेली कर आकारणीची प्रारूप यादी शहराच्या भौगोलिक परिस्थिती व नागरिकांच्या आर्थिक क्षमतेशी सुसंगत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवरच या प्रक्रियेचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.
मंजूर ठरावातील महत्त्वाचे मुद्दे :
सध्या सुरू असलेली चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया नगरपरिषद स्तरावर स्थगित करण्यात येत आहे. सुधारणा पूर्ण होईपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊ नये.
झोन निश्चिती करताना झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित एजन्सीमार्फत आर्थिक स्तरानुसार फेरसर्वेक्षण करण्यात यावे.
‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी निश्चित करण्यात आलेला करदर जास्त असल्याने तो कमी करून नागरिकांवरील आर्थिक बोजा हलका करण्यात यावा.
व्यावसायिक मालमत्तांवरील दुप्पट कर आकारणी रद्द करून ती निवासी दराच्या दीडपट करण्यात यावी.
वार्षिक भाडेमूल्य निश्चित करताना सध्याचे बाजारभाव व मालमत्तेची प्रत्यक्ष स्थिती यांचा वस्तुनिष्ठ विचार करून कपात करण्यात यावी.
नगरपरिषद प्रशासनाने प्रभागनिहाय विशेष शिबिरे आयोजित करून प्रत्येक नागरिकाच्या हरकतीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करावी व सुधारित दराने कर आकारणी करावी.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था, स्वातंत्र्यसैनिक व दिव्यांगांना नियमानुसार करसवलत देण्यात यावी.
ठराव
वरील सर्व सुधारणा समाविष्ट करूनच नवीन सुधारित प्रारूप यादी तयार करण्यात यावी. लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही करवाढ लागू करू नये. सुधारणा पूर्ण होईपर्यंत सध्याची प्रक्रिया पूर्णतः स्थगित राहील. सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजन्सीने तयार केलेली सुधारित प्रारूप यादी व सविस्तर प्रस्ताव नगरपरिषद सभागृहासमोर सादर करावा. सभागृहाच्या अंतिम मान्यतेशिवाय व चर्चेविना करवाढ लागू करण्यात येऊ नये. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
प्रतिक्रिया
“नगरपरिषद प्रशासनाने महसूल वाढवताना सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा व शहराच्या एकूण आर्थिक स्थितीचा विचार करणे आवश्यक होते. तो न झाल्याने आम्हाला नागरिकांच्या हितासाठी हा ठराव मंजूर करावा लागला,” अशी प्रतिक्रिया डॉ. अंकुश बालाजी लाड यांनी दिली.

Previous Post

7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

Next Post

🟥🟦 🔴🟢 जागरूक नगरसेवकांचा पुढाकार; चराटी–आपटे कॉलनीतील बगीचा अखेर नागरिकांसाठी खुला! 🟢🔴 🟦🟥

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
🟥🟦 🔴🟢 जागरूक नगरसेवकांचा पुढाकार; चराटी–आपटे कॉलनीतील बगीचा अखेर नागरिकांसाठी खुला! 🟢🔴 🟦🟥

🟥🟦 🔴🟢 जागरूक नगरसेवकांचा पुढाकार; चराटी–आपटे कॉलनीतील बगीचा अखेर नागरिकांसाठी खुला! 🟢🔴 🟦🟥

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In