नितेश गट्टीवार ,चामोर्शी (गडचिरोली):दि.27 तालुक्यातील भेंडाळा भागातील शेतकरी व शेतमजूर 10 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या जीआर निषेधार्थ सामुदायिक होळी दहन आंदोलन छेडणार असून हे आंदोलन 2 मार्च रोजी भेंडाळा येथील बस स्टॉप येथे होणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत करणार आहेत संबंधित जि आर मुळे भेंडाळा भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण येणाऱ्या काळात होण्याचा भितीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाने 10फेब्रुवारी रोजी काढलेल्या जीआर मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम होणार असून , योग्य मोबदला, पुनर्वसन व पर्यायी उपजिविकेसाठी हमी न देता जमिन संपादनाची प्रक्रीया राबवीली जात आहे.त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



