एस. पी. हायस्कुल मध्ये होळी सन संपन्न..,
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड :-फाल्गुन महिन्यात येणारा होळी व धुळवड सण बारा महिन्याच्या सणात आपलं वेगळेपण दाखवणारा आहे. या होळीला शेणी व लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यासाठी नागरिकांनी परिसरातील प्लास्टिक, पालापाचोळा गोळा करून त्याची होळी केली तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असे प्रतिपादन हरित सेनेचे संचालक सतीशराव माने यांनी केले.
होळीनिमित्त येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी परिसरातील पालापाचोळा प्लास्टिक गोळा करून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली आहे त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विनया जाधव होत्या.
ते पुढे म्हणाले की, फाल्गुन महिन्यात येणार्या या होळीला लाकडे व शेणीचा वारेमाप वापर होताना दिसत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठी हानी होते. ती थांबवण्यासाठी नव्या पिढीच्या तरुणांंनी लाकडे व शेणीचा होळीसाठी वापर न करता परिसरातील पाला पाचोळा,प्लास्टिक गोळा करून त्याची होळी करावी.
गेली चोवीस वर्षे हरित सेनेच्यावतीने येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर पालापाचोळा,प्लास्टिक गोळा करून होळी साजरी करण्यात येते. तसेच नरसिंहवाडी व इतर ठिकाणी गोरगरिबांना पोळ्यांचे वाटप करण्यात येते.
यावेळी होळीचे पूजन मुख्याध्यापिका विनया जाधव व प्रभारी पर्यवेक्षक सदाशिव तिगणे यांच्या हस्ते करून होळी पेटविण्यात आली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बोंब मारून होळीचा आनंद लुटला.
यावेळी दत्तात्रय राजमाने, विजय शहापुरे, राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडिंग ऑफिसर गजानन केरीपाळे, बाबासाहेब भुजुगडे, राहुल जंगम, सुधाकर कांबळे सच्चिदानंद जंगम, धनंजय काळे, उत्तम पाटील, सुनिता कुलकर्णी, कल्पना पाटील, सोमनाथ संगम जितेंद्र कुलकर्णी या मान्यवरासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील एस.पी. हायस्कूलच्या क्रीडांगणावर हरित सेनेच्यावतीने पालापाचोळा, प्लास्टिकची होळी करण्यात आली. होळीचे पूजन करताना मुख्याध्यापिका विनया जाधव











