मानवत प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
दि. 5/3/26 रोजी
मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा (Quiz) व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारतीय संविधानाबद्दल जागरूकता वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी तर निबंध स्पर्धेत 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
निबंध स्पर्धेत वंदना संजय ढवळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक शेख सबा पाशा व तन्वी विठ्ठलराव माकोडे यांनी मिळवला. तृतीय क्रमांक सागर संतोष पांढरे व आल्फिया शेख इमाम यांनी पटकावला. तसेच शितल हनुमान वावरे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत वंदना संजय ढवळे व धर्माधिकारी वैष्णवी आदेश यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक सागर संतोष पांढरे यांनी मिळवला, तर प्रशांत विष्णू उक्कलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. श्रद्धा पांडूरंग घोडके व दीक्षा उत्तम बनसोडे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. कैलास बोरुडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित मोरे व प्रा. बाळासाहेब भिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंडित मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विनायक चोपडे यांनी केले.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाहीविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली. सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.










