• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड परिसरात होळी सणानंतर रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न…

by
March 8, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड परिसरात होळी सणानंतर  रंगपंचमी  मोठ्या उत्साहात  संपन्न…
0
SHARES
87
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड परिसरात होळी सणानंतर रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न…..

प्रतिनिधी :- दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- कुरुंदवाड शहर व परिसरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला होळी पाठोपाठ दुसरा दिवस धुलिवंदन अर्थात धुळवड ही उत्साहात झाली. शहर व परिसरात आबालवृद्धांनी रंगपंचमी खेळुन वसंत ऋतूचे स्वागत केले. अनेक ठिकाणी कोरडी, ओली रंगपचमी खेळण्यावर भर देण्यात आला होता. तर रस्ते हे रंगमय झाले होते. तर डॉल्बीच्या तालावर अनेक तरुणांनी थिरकत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.

सोमवारी सायंकाळी घरोघरी विधिवत पूजा करून होळी पेटविण्यात आली. त्याचबरोबर विविध भागात मंडळांच्या वतीने होळीचे पूजन करण्यात आले. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी बालचमू कडून टिमकीचा दणदणाट करण्यात येत होता.शेणी, लाकडे गोळा करण्यात बालचमू मग्न होता. सायंकाळी शेणी, लाकडासह सर्वापेक्षा आपली होळी मोठी असण्याकडे तरुणाईचा कल होता. यावेळी बालचमूनी जोरदार शंखध्वनी केला. दरम्यान शहरातील काही मंडळांनी सामाजिक भावनेतून शेणीदान व पुरण पोळी आश्रम शाळेस दान देण्याचे उपक्रम राबविण्यात आले.

होळी नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. रविवारी सकाळ पासून येथील शहर व परिसरात तरूणाईसह आबालवृद्ध रंगांची उधळण करत होते. दुपारनंतर युवक व युवती या रंगपंचमीच्या सणात सामील झाले होते. शहरातील गल्लीबोळासह चौका-चौकात रंगपंचमी साजरी करण्यात आल्याने रस्ते गुलाबी, निळे, लाल, पिवळे, हिरवे, तांबड्या रंगाने नाऊन निघाले होते. बच्चेकंपनी एकमेकांच्या अंगावर पिचकारीने रंग उडताना दिसून आले तर रंगाने भरलेले फुगे अंगावर फोडून रंगपंचमी साजरी केली. युवक, युवतीने एकमेकांच्या चेहऱ्याला रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. काही ठिकाणी महिलांनी कोरड्या रंगाऐवजी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मोठ्या उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी केली.

गेली दोन दिवस विविध रंगानी व पिचकारी, फूगे यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली होती. रंग पिचकारी व फुगे खरेदी करण्यासाठी युवक व युतीने दुकानात मोठी गर्दी केली होती. येथील ओंकार चौक, गिरीश सिनेमा जवळ मोरया क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने, सन्मित्र चौक, नगरपरिषद चौक, काळाराम मंदिर, ईगल चौक, डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक, भैरववाडी, माळ भाग या परिसरात डॉल्बीच्या तालावर तरुणाईने थिरकत मोठ्या उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी केली. या रंगपंचमी उत्सवात नागरिकां सह तरुणाई व बालचमू सहभागी झाले होते.

कुरुंदवाड नगरपरिषदेने तबक उद्यान येथे रंगपंचमीचा घाट घातला होता, आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी रंगपंचमीचे आयोजन कुरुंदवाड नगरींच्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा मनिषा डांगे व महिला व बाल कल्याण सभापती जुवेरिया गोलंदाज यांनी बंदिस्त रंगपंचमी चा नवीन उपक्रम राबवीत. महिला दिन ही साजरा केला.महिलांचा मोठा सहभाग दिसून येत होता.

Previous Post

सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला तात्काळ निधी द्या, अन्यथा उग्र आंदोलन; मराठा महासंघाचा सरकारला इशारा

Next Post

जागतिक महिला दिन-विशेष लेख महिला हक्क आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा जागतिक महिला दिन

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

जागतिक महिला दिन-विशेष लेख महिला हक्क आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा जागतिक महिला दिन

ताज्या बातम्या

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

May 4, 2026
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

May 4, 2026
जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

May 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In