• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

by
March 9, 2026
in शिक्षण
0
निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
0
SHARES
204
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – ०९-०३-२०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव माढा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुक्ता महादेव चव्हाण या होत्या.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
नवनिर्वाचित तालुका पंचायत समिती सदस्य सौ सोनालीताई मनोज साठे यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे शाल, श्रीफळ,मानाचा फेटा, पुष्पहार, देऊन विशेषत्वाने सन्मानित करण्यात आले . पुढे बोलताना सौ साठे म्हणाल्या की शाळेच्या गुणवत्ता विकासात मला शिक्षकांचे खूप योगदान दिसते आहे. इथून पुढे पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी विशेषत्वाने या मराठी शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मुन्ना (अण्णा )साठे यांच्या साथीने प्रयत्नशील राहीन .
माढा येथील प्रसिद्ध डॉ. सौ. उमा पाटील मॅडम यांनी महिलांचे आरोग्य व सबलीकरण , डॉ.सोनाली देवकुळे मॅडम यांनी कर्करोग , पूजा चव्हाण मॅडम यांनी बचत गटाचे आर्थिक सबलीकरणात महत्त्व, कवयित्री मोहिनी चव्हाण – कोल्हे मॅडम यांनी स्त्रीशक्ती विषयी कविता सादर करून महिलांचे उद्बोधन केले .
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो या गवळणी वर सुंदर नृत्य करून इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी प्रांजल मुकुंद कदम हिने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले. त्याबद्दल तिचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला
सहभागी सर्व महिलांच्या सुंदर हस्ताक्षर ,उखाणे , बादलीत बॉल टाकणं,संगीत खुर्ची या स्पर्धा अत्यंत चुरशीने आणि आनंदी वातावरणात पार पडल्या.
वरील स्पर्धेतील पहिले तीन विजेत्या महिलांना सौ .सोनालीताई साठे सौ. मुक्ता चव्हाण यांचे हस्ते आकर्षक व गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून वितरण करण्यात आली.

बक्षीस वितरणाचा संपूर्ण खर्च गावचे प्रसिद्ध उद्योजक व प्रगतशील बागायतदार श्री महादेव तुकाराम चव्हाण यांनी स्वतः उचलला. यापुढे शाळेला लागणाऱ्या भौतिक गरजेसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
तर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष श्रीम.कौसर रसूल पठाण यांनी सर्व उपस्थित महिला व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत वाघमारे, डॉ.आकाश देवकुळे, श्री मुकुंद कदम, श्री सिद्धेश्वर शिंदे तसेच सर्वच वयोगटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
शाळेच्या कलाशिक्षिका श्रीम. कुमुदिनी गिड्डे यांच्या विविधांगी संकल्पनेतून पार पडलेल्या कार्यक्रमाला श्री माधव गायकवाड सर यांनी प्रसंगावधान राखून उत्कृष्टपणे निवेदन करून रंगत आणली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर कापसे यांनी प्रमुख पाहुणे आणि घरातील सर्व कामे सोडून शैक्षणिक क्रांतीसाठी वेळ देणाऱ्या सर्व माता भगिनींचे आभार मानले.

Tags: Sopan Chavan
Previous Post

नगरसेवक सचिन चोरडियांतर्फे महिलांसाठी मोफत सहलीचे आयोजन; महिला दिनानिमित्त आगळीवेगळी भेट

Next Post

नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 संपन्न

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
28
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
Next Post

नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 संपन्न

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In