• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

by
March 20, 2026
in शिक्षण
0
0
SHARES
28
VIEWS

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

Ad 1

सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तब्बल ११ हजार १४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची या गुढीपाडव्याला नोंद झाली कसबे डिग्रज इथे एका शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे सी इ ओ विशाल नरवडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पुढील आठ दिवस हि प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे यावेळी विशाल नरवडे यांनी सांगितले. या प्रवेशाचा जास्ती जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे गुढीपाडव्याला शिक्षण विभाग आणि शिक्षकांकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. अनेक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेण्याकडे पसंती दाखवली. काही शाळांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमधून नव्याने नियुक्त जिल्हा परिषद सदस्य आवर्जून उपस्थित होते त्यांनीही या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये भेटी देऊन प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवले. जिल्ह्यंडे दहा तालुक्यांमधून सुमारे १८ हजार विद्यार्थी प्रवेशास पात्र असल्याचे यावेळी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले त्यापैकी तब्बल ११ हजार विद्यार्थ्यी वर्गाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अनुकूलता दाखवत या शाळांवरील विश्वास कायम ठेवला आहे. सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश खानापूर तालुक्यातील शाळांमध्ये झाला असून सर्वात कमी प्रवेश वाळवा तालुक्यातील शाळांमध्ये नोंदवला गेलाय. जिल्हा  परिषदेच्या वतीने राबण्यात येणाऱ्या मॉडर्न स्कुल चा फायदा यावेळी प्रवेश प्रक्रियेवर चांगला झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शाळांमधून भौतिक सुविधांना प्राधान्य देत सुधारणा करण्यात आली असून गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवण्यात आले आहेत. शाळांमधून डिजिटल क्लासरूम तसेच शाळांमधील वर्गांचे रुपडे पालटल्याने आता विद्यार्थ्यांना या शाळांमधील शिक्षण हवे हवेसे वाटत आहे.                    

Previous Post

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Next Post

रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता! एप्रिलमध्ये मिळणार तिप्पट धान्य

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 9, 2026
204
Next Post

रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता! एप्रिलमध्ये मिळणार तिप्पट धान्य

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In