• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी): राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून त्याच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम, तालुका शाखा माहूर यांच्या वतीने राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले.

दि. २५ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हे निवेदन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यामार्फत पाठविण्यात आले. निवेदनात वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे नमूद करत वाढत्या खर्चामुळे हा उद्योग अडचणीत सापडल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

निवेदनानुसार, सन २०१९ पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज व इतर खर्चामध्ये सुमारे १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्यानुसार शासकीय जाहिरात दरात वाढ करण्यात आलेली नसल्याने विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

यावेळी संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

  • शासकीय जाहिरात दरात किमान १५०% वाढ करावी
  • ई-टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात
  • जाहिरातींसाठी किमान १०० चौ. से. आकार निश्चित करावा
  • जाहिरात देयके ३० दिवसांत अदा करून विलंब झाल्यास व्याज द्यावे
  • लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी द्यावी
  • सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्याची सक्ती करावी
  • प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत
  • १० वर्ष सेवा असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती व २० वर्ष सेवा व ५५ वर्ष वय पूर्ण झालेल्यांना पेन्शन लागू करावी

वृत्तपत्र उद्योग मजबूत राहिल्यासच जनतेच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण होऊ शकते, त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया, माहूरचे तालुकाध्यक्ष इलियास बावाणी, जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले, तालुका सरचिटणीस संजय बनसोडे, फिरोज पठाण, गजानन कुलकर्णी, सचिन बेहेरे, सय्यद किरमाणी आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र

Next Post

माहूरमध्ये डीजेवर बंदीची मागणी; शिवसेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी यांचे पोलिसांना निवेदन

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
10
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
5
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
2
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
5
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
1
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
2
Next Post
माहूरमध्ये डीजेवर बंदीची मागणी; शिवसेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी यांचे पोलिसांना निवेदन

माहूरमध्ये डीजेवर बंदीची मागणी; शिवसेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी यांचे पोलिसांना निवेदन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In