• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिपळूणमध्ये पत्रकारावर हल्ला; दापोलीत संतापाची लाट, कारवाईचा अल्टिमेटम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
चिपळूणमध्ये पत्रकारावर हल्ला; दापोलीत संतापाची लाट, कारवाईचा अल्टिमेटम
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

दापोली | २५ मार्च (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर बहादूर शेख नाका परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींचे वृत्तांकन करत असताना ही मारहाण झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच दापोली तालुक्यातील पत्रकार एकत्र येत या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला. “कर्तव्य बजावताना पत्रकारांवर हल्ले होत असतील, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

याप्रकरणी दापोलीतील पत्रकारांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. हल्लेखोरांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर विविध माध्यम प्रतिनिधींनी सह्या करत एकजूट दर्शवली. “दोषींना त्वरित अटक झाली नाही, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असा स्पष्ट इशारा पत्रकारांनी दिला.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थता पसरली असून, नागरिकांकडूनही दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

चोपडा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार २K२६’ सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात संपन्न

Next Post

गाढे गव्हाणमध्ये सरकारी रस्ता अडवल्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
13
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
61
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
गाढे गव्हाणमध्ये सरकारी रस्ता अडवल्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

गाढे गव्हाणमध्ये सरकारी रस्ता अडवल्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In