• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हळद काढणीचे दर गगनाला; एकरी १४ हजार मजुरीमुळे शेतकरी चिंतेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
हळद काढणीचे दर गगनाला; एकरी १४ हजार मजुरीमुळे शेतकरी चिंतेत
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

वाशिम (प्रतिनिधी : भागवत घुगे) : सांगली नंतर हिंगोली व वाशिम जिल्हा हळद उत्पादनात राज्यात अग्रेसर मानला जातो. यंदा जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली असली तरी अतिवृष्टीमुळे कंदसड रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यातच हळद काढणीच्या मजुरीचे दर एकरी १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

रिसोड तालुक्यासह जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून समाधानकारक दर मिळाल्याने यंदाही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, काढणीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई जाणवत आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

परजिल्ह्यातील मजुरांवर अवलंबित्व
स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना परजिल्ह्यातील मजुरांना बोलवावे लागत आहे. यासाठी अधिक मजुरी द्यावी लागत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे मजुरी वाढत असताना दुसरीकडे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद काढणीची कामे मंदावली आहेत. काढलेली हळद शिजवण्यासाठी ढगाळ वातावरणामुळे अडचणी निर्माण झाल्या असून शिजवणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. पाऊस थांबल्यानंतरच या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

उत्पादनात घट
कंदसड रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रतिएकर उतारा अपेक्षित असताना यंदा तो २० ते २२ क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.

दरात मंदी; निर्यातीवर परिणाम
सध्या हळदीला १२ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी अपेक्षित दर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची नाराजी आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्याने बाजारात मंदी निर्माण झाली आहे. यंदा किमान १५ ते १८ हजार रुपये दर मिळण्याची अपेक्षा होती.

शेतकऱ्यांची मागणी
“हळद काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. परराज्यातील मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. काढणी खर्च प्रचंड वाढला असून हळदीला योग्य भाव मिळावा,” अशी मागणी मोरगव्हाण येथील शेतकरी प्रकाश नामदेव काळे यांनी व्यक्त केली.

एकूणच, वाढलेला खर्च, घटलेले उत्पादन आणि दरातील अनिश्चितता यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

Previous Post

पाटणबोरीतील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा संपन्न

Next Post

ग्रामपंचायत नवरगाव (पुनर्वसन) टीबीमुक्त घोषित; आरोग्य विभागाकडून गौरव

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
22
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
84
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
ग्रामपंचायत नवरगाव (पुनर्वसन) टीबीमुक्त घोषित; आरोग्य विभागाकडून गौरव

ग्रामपंचायत नवरगाव (पुनर्वसन) टीबीमुक्त घोषित; आरोग्य विभागाकडून गौरव

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In