• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दगडवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांना ज्ञानमृताचा लाभ घेण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

२९ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान विविध कीर्तन-प्रवचनांचा आध्यात्मिक सोहळा

अहमदपूर | प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजे दगडवाडी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध ११, रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी सप्ताहाची सुरुवात होणार असून, चैत्र कृ. ३, रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सांगता होणार आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या सप्ताहाची सुरुवात दि. २९ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप बापूदेव महाराज बेलगावकर यांच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर दररोज सकाळी ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १ गाथा-हरिपाठ, १ ते ३ रामायण प्रवचन, ३ ते ६ अन्नदान पंगत, ६ ते ८ धूपारती व भजन, तर रात्री ९ ते ११ कीर्तन आणि त्यानंतर रात्रभर जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.

सप्ताहादरम्यान विविध मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून, त्यात व्यंकट महाराज केंद्रे (हाडोळी), बंडोपंत महाराज कोद्रीकर, कृष्णा महाराज धानोरा, दत्ता महाराज बोर्डेकर, नारायण महाराज शास्त्री केंद्रे, माऊली महाराज शिंदगीकर आणि कृष्णा महाराज गुट्टे (आळंदी) यांचा समावेश आहे.

दि. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त पहाटे ४ ते ६ या वेळेत रामकिसन गुट्टे गुरुजी महाराज यांचे विशेष कीर्तन होणार आहे.

सप्ताहाची सांगता दि. ५ एप्रिल रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ज्ञानोबा माऊली महाराज अरबुजवाडीकर यांच्या पूजेच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ज्ञानेश्वर महाराज घुले (नवाबवाडी) यांचे कीर्तन व भारूडाचा कार्यक्रम होणार असून, पहाटे विनोदाचार्य व्यंकट महाराज गित्ते (दगडवाडीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि मंदिर प्रदक्षिणा व आरतीने सप्ताहाची सांगता करण्यात येईल.

या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळ, दगडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी

Next Post

गॅस, पेट्रोल, डिझेलनंतर आता लॉकडाऊनची अफवा; माहूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
17
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
35
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

गॅस, पेट्रोल, डिझेलनंतर आता लॉकडाऊनची अफवा; माहूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In