• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापुरातील आजऱ्यात यंत्राद्वारे भात रोप लागण; शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

आजरा :

आजरा तालुक्यात १ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे तरवा पेरणी व रोप लागण यांत्रिकी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने ७ गावांसाठी ७ यांत्रिकी मशीनची ऑर्डर नागालँड व हरियाणा राज्यात दिली आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या उपक्रमामुळे भात रोप लागणीवेळी होणाऱ्या मजुरांच्या तुटवड्याला प्रभावी पर्याय उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आजरा तालुक्यात मुबलक पाऊस व अनुकूल हवामानामुळे भाताचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते, मात्र रोजगारासाठी तरुणांचे शहराकडे स्थलांतर वाढल्याने शेतीकडे ओढा कमी झाला असून मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सुमारे २५ टक्के क्षेत्र ओसाड पडले आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने तरवा पेरणी मशीन चेन्नई येथून तर भात लागण मशीन नागालँड व हरियाणा येथून आणण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची रक्कमही भरली आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही प्रकारची ७ मशीन उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण :
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात पेरणी व रोप लागण याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये

  • भात रोपे तयार करणे
  • यंत्र चालवणे व हाताळणे
  • तरवा तयार करून यंत्राने पेरणी करणे
  • रोप लागण मशीनची प्रात्यक्षिके

यांचा समावेश असेल. प्रत्येक गावातून १० शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.

९ हजार १०० हेक्टर क्षेत्र :
तालुक्यात धरणांमुळे पाणीसाठा वाढल्याने काही प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी सध्या ९ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. त्यापैकी ५५०० हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागण केली जाते.

पहिल्याच वर्षी १ हजार हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने भात रोप लागण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

Previous Post

आजरा तालुक्यात अनुसूचित जाती व नवबुद्ध लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

Next Post

आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
17
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
35
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In