• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक ढोल-ताशा, सनई-बँडच्या निनादात देवाची सजवलेली पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मानकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा विधिवत संपन्न झाला. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पुढे पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना काढण्यात आला. देवाच्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली.

यावेळी मानकरी दगडू शिंगाडे यांनी सांगितले की, देवावरील श्रद्धेमुळे भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून दादा महाराज करगळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी भाविकांना भक्तिमार्ग दाखवला असून भविष्यातही ते अशीच सेवा करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीने भाकीतही वर्तविण्यात आले. पावसाचे प्रमाण, नक्षत्रानुसार शेतीचे नियोजन आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, ज्यावर शेतकरी बांधवांचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

देवस्थानचे प्रमुख दादा महाराज करगळ यांनी सांगितले की, मानकरी आणि भाविकांच्या सहकार्यामुळे हा उत्सव दरवर्षी यशस्वीपणे पार पडतो. विविध भागातून येणाऱ्या भाविकांमुळे या तीर्थक्षेत्राचा विकास झाला असून भाविकांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व मानकरी व भाविकांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला मानकरी दगडू शिंगाडे, नाना तरडे, बापू बुरुंगले, लाला हटकर, पोपट दवाण, राऊस जमदाडे, हनुमंत जमदाडे, कैलास रसाळ, संतोष कुमार राऊत, शिवाजी लटपटे, बाळासाहेब वीर, खेडू तांबे, मल्हारी तांबे, महादेव तांबे, अमोल कोकरे, तेजस तांबे, नाना मोरे, मधु लांडे, धुळा तांबे, तात्या तनपुरे, सुरज तांबे, नानासाहेब तांबे, बाबासाहेब करगळ, गोदाजी तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Tags: Amrut Karande
Previous Post

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

Next Post

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In