• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

तीन बसफेऱ्या बंद झाल्याने संतप्त प्रवासी रस्त्यावर; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

भडगाव | प्रतिनिधी

भडगाव ते वाडे मुक्कामे बस मार्गावरील तीन बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवासी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा पहिला दिवस आज पार पडला.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर “भडगाव ते वाडे मुक्कामे बसच्या तीन फेऱ्या बंद – बसफेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी, प्रवाशांचे आमरण उपोषण” असा उल्लेख करण्यात आला असून ग्रामीण भागातील नागरिकांचा तीव्र संताप यावेळी पाहायला मिळाला.

उपोषणकर्ते पत्रकार अशोक परदेशी, दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार राजेंद्र परदेशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, वाडे व परिसरातील अनेक गावांतील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शेतकरी, मजूर तसेच नोकरदार वर्गासाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वाची होती. मात्र अचानक तीन बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने दैनंदिन प्रवास विस्कळीत झाला आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भार वाढल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

उपोषणकर्त्यांनी पूर्वीप्रमाणे सर्व सहा बसफेऱ्या सुरू करण्याची ठाम मागणी केली असून, बससेवा नियमित न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा कमी करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर घाला घालण्यासारखे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित परिवहन प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. आता प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भडगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीरित्या संपन्न

Next Post

ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In