• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीरित्या संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
भडगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीरित्या संपन्न
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

१२ प्रकरणे सामोपचाराने निकाली; ₹ १७.६३ लाखांची तडजोड

भडगाव | प्रतिनिधी

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

विधी सेवा समिती, भडगाव व तालुका वकील संघ, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथील न्यायालय परिसरात शनिवार, दि. ०९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयामध्ये न्यायालयीन प्रलंबित तसेच वादपूर्व (Pre-Litigation) स्वरूपाच्या विविध प्रकरणांचा समावेश करण्यात येऊन संबंधित पक्षकारांमध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणण्यात आली.

सदर राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकूण १२ प्रकरणे सामुच्चाराने निकाली काढण्यात आली असून संबंधित पक्षकारांमध्ये परस्पर समेट व तडजोडीच्या माध्यमातून *एकूण रुपये १७ लाख ६३ हजार ५२८ इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. न्यायालयीन वाद त्वरित, कमी खर्चात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात निकाली काढण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास पक्षकारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे संपूर्ण कामकाज भडगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती प्रावी राजळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पक्षकारांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन अनेक वाद न्यायालयीन दीर्घ प्रक्रियेविना निकाली काढणे शक्य झाल्याचे सांगण्यात आले.

तसेच, या लोकन्यायालयामध्ये पॅनल ॲडव्होकेट समाधान सोनवणे यांनी समन्वयाची भूमिका बजावत कामकाज प्रभावीपणे हाताळले. संबंधित पक्षकारांना कायदेशीर मार्गदर्शन करून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका वकील संघ, भडगावचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील, उपाध्यक्ष ॲड. गणेश वेलसे, सचिव ॲड. प्रकाश सोनवणे यांच्यासह सर्व विधिज्ञांनी सक्रिय सहकार्य केले. तसेच विधी सेवा समिती, भडगाव येथील न्यायालयीन कर्मचारी वर्गानेही अथक परिश्रम घेत आयोजन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून वादग्रस्त प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यास प्राधान्य दिले जात असून, सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्यासाठी ही संकल्पना प्रभावी ठरत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

Previous Post

पत्रकार संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला; तिघांना अटक, एक फरार

Next Post

“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
107
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस

“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In