• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in Blog
0
नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी
0
SHARES
68
VIEWS
Ad 1

नांदेड : लोहा येथील लग्न समारंभ आटोपून सहपरिवार परत येत असताना दि. २ मे रोजी नांदेड–लोहा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात हस्तरा येथील अनिल चिलोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला देखील मोठी दुखापत झाली आहे. दुचाकीला पाठीमागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ईश्वर कृपेने दोघांचेही प्राण वाचले आहेत.

अपघातानंतर अनिल चिलोरे यांच्यावर यशोसाई हॉस्पिटल, नांदेड येथे उपचार सुरू असून ते दि. २ मेपासून बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले असून प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पत्नीवर रेणुका हॉस्पिटल, LIC चौक, नांदेड येथे उपचार सुरू असून कारने फरफटत नेल्यामुळे त्यांचा पाय मोडला आहे. त्यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या दाम्पत्याच्या पाठीमागे दोन मुली व एक मुलगा असून उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मित्रपरिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे.

मागील शनिवारी गोदाजी सोनार व बालू गाडे यांनी रुग्णालयात भेट देऊन वैयक्तिक मदत केली होती. त्यानंतर गंगाराम पाटील हायस्कूल निवघा बाजार येथील दहावी 1996-97 बॅचच्या मित्रांनी ग्रुपमध्ये चर्चा करून आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय घेतला.

आज गोदाजी सोनार, संतोष शिंदे आणि बालू गाडे यांनी मिळून ₹५० हजारांची मदत अनिल चिलोरे यांचे भाऊ प्रदीप चिलोरे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच मित्रपरिवाराकडून एकूण ₹५५ हजारांची मदत जमा करण्यात आली.

“अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करणे हेच खरी मैत्री आणि सामाजिक बांधिलकी आहे,” अशी भावना मित्रपरिवाराने व्यक्त केली.
अनिल चिलोरे आणि त्यांच्या पत्नीने लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Previous Post

दोंडाईचा शहराची चिमुकली कु. विनीशा विकास बाटुंगे हिची फिल्म इंडस्ट्रीत दमदार झेप

Next Post

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In