• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चा दिमाखदार सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in Blog
0
पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चा दिमाखदार सोहळा संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा विशेष सन्मान

एरंडोल (प्रतिनिधी):
जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून ‘कार्टून कंबाईन्स’ संस्था आणि ‘युवा संवाद सामाजिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे आयोजित या महोत्सवात तब्बल ४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, सामाजिक वास्तवावर मिश्किल आणि टोकदार भाष्य करणाऱ्या कलाकृतींना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

महोत्सवाचे उद्घाटन उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एरंडोल येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सकाळ ॲग्रोवनचे व्यंगचित्रकार लहू काळे, श्रीपाद पालकर, अरविंद देशपांडे, रवींद्र बाळापुरे, सोमेश्वर गजमल, सिद्धार्थ नागठाणकर, सुहास पालीमकर, आशिष विखार, योगेश चव्हाण, गिरीश पाटील आदी मान्यवर व्यंगचित्रकारांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला ‘कार्टुनिस्टस् कम्बाईन’चे अध्यक्ष गौरव सर्जेराव, उपाध्यक्ष अमित पापळ, खजिनदार उदय मोहिते, मुख्य समन्वयक किशोर शितोळे, आयोजक धनराज गरड, बाळासाहेब धोका, शशिकांत कांबळे यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

“व्यंगचित्रकार हा संवेदनांचा जागता पहारेकरी” – सुषमा अंधारे

उद्घाटनपर भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या,
“व्यंगचित्रकार हा कमीत कमी शब्दांत आणि मोजक्या रेषांमधून मोठा आशय मांडणारा कलाकार असतो. राजाश्रय नसतानाही सत्याची बाजू मांडण्याचे धाडस तो दाखवतो. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता स्वातंत्र्य अनेक आव्हानांना सामोरे जात असताना व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून सामाजिक संवेदनशीलता जिवंत ठेवत आहेत.”

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही व्यंगचित्र ही समाजपरिवर्तनाची प्रभावी कला असल्याचे सांगत, अशा महोत्सवांची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी ‘कार्टुनिस्टस् कम्बाईन’चे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी पुण्यात व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र ‘व्यंगचित्र भवन’ उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

हे प्रदर्शन ७ मे ते ९ मे २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर शितोळे यांनी मानले.

Previous Post

पंतप्रधान मोदींसाठी नाशिकच्या नववधूचा मोठा त्याग; स्वप्न बाजूला सारत देशहिताचा घेतला निर्णय

Next Post

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
17
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
38
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In