• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भगवंताचे प्रेम भौतिक नव्हे, तर आध्यात्मिक असते : रामगिरीजी महाराज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
भगवंताचे प्रेम भौतिक नव्हे, तर आध्यात्मिक असते : रामगिरीजी महाराज
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

अंदरसुल / प्रतिनिधी :

येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच संगीतमय तुलसी रामायण कार्यक्रमाचा आज भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

समारोपाच्या दिवशी सकाळी शनिदेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली. यानंतर महाराजांचे कीर्तन पार पडले.

कीर्तनात महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग —

“विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥”

हा अभंग निवडून त्यावर सखोल निरूपण केले.

रामगिरीजी महाराज म्हणाले की, जो परमात्मा संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे, तोच भक्तांच्या प्रेमापोटी माता यशोदेला “आई” म्हणतो. ही भगवंताच्या भक्तवत्सलतेची सर्वोच्च लीला आहे. देव भक्तांच्या प्रेमामुळे स्वतःला त्यांच्या अधीन करून घेतो. भक्त ज्या भावनेने भगवंताची भक्ती करतो, त्याच भावनेने परमेश्वरही भक्तावर प्रेम करतो.

महाराजांनी पुढे सांगितले की, परमात्मा निष्काम आणि अलिप्त असला तरी गोपिकांवर त्याने प्रेमाचा असा लळा लावला की त्या सर्वस्व विसरून श्रीकृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. हे प्रेम भौतिक नसून पूर्णपणे आध्यात्मिक आहे. म्हणूनच भगवंताचे प्रेम माणसाला ईश्वराशी जोडते.

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून निर्गुण आणि सगुण भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जे निराकार, अव्यक्त ब्रह्म आहे तेच भक्तांच्या प्रेमासाठी सुंदर सगुण रूप धारण करून पृथ्वीवर अवतरते, असे महाराजांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

वरकुटे मलवडी येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Next Post

“सहेर तुफेल”चे शालांत परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
56
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
“सहेर तुफेल”चे शालांत परीक्षेत घवघवीत यश

“सहेर तुफेल”चे शालांत परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In