• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरसगाव येथे “श्री लोमेश ऋषी सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका”चे उद्घाटन संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
शिरसगाव येथे “श्री लोमेश ऋषी सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका”चे उद्घाटन संपन्न
0
SHARES
58
VIEWS
Ad 1
Ad 1

शिरसगाव (ता. येवला, जि. नाशिक) | प्रतिनिधी

लोणारी युवा संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित श्री लोमेश ऋषी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका याचे उद्घाटन दिनांक २४ मे २०२६ रोजी शिरसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि महिलांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱ्या लोणारी युवा संघाच्या माध्यमातून ही दुसरी ग्रामीण अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यात पहिली अभ्यासिका यशस्वीपणे सुरू करण्यात आली होती.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून येवला नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. दिपकभाऊ लोणारी, सरपंच श्री. ज्ञानेश्वर शेवाळे, उपसरपंच सौ. सरला बाळासाहेब बुल्हे, नायब तहसीलदार श्री. देवेंद्र कुऱ्हे, आरटीओ अधिकारी श्री. मनोज लोणकर, तसेच विविध शासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोणारी युवा संघ (म. राज्य) चे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय संवत्सरकर यांनी भूषवले.

या प्रसंगी शासकीय नोकरीत कार्यरत तसेच उद्योजक म्हणून यशस्वी झालेल्या युवक-युवतींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

तसेच इतर मागासवर्गीय महामंडळ व स्व. विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. पवन आलई यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष दादरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरज आढाव यांनी केले.

लोणारी युवा संघ (म. राज्य) च्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली असून ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व देणगीदार यांचे आभार मानण्यात आले.

या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी व सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार असून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

पुरंदर कृषी एक्स्पो २०२६ : आधुनिक शेती व ग्रामीण विकासाचे भव्य प्रदर्शन

Next Post

किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
234
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In