• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१२ वर्षांनंतर मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित; आजरा परिसराला अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 10, 2026
in Blog
0
१२ वर्षांनंतर मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित; आजरा परिसराला अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

गेल्या तब्बल १२ वर्षांपासून तांत्रिक अडचणी आणि स्थानिक स्तरावरील विविध समस्यांमुळे रखडलेली मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी अखेर कार्यान्वित करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न तसेच अन्याय निवारण समिती व स्थानिक नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

सदर वीजवाहिनी सुमारे १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक त्रुटी तसेच शेतकरी व ग्राहकांच्या तक्रारींमुळे ती प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नव्हती. परिणामी, मोठी पायाभूत सुविधा उभारूनही तिचा लाभ नागरिकांना मिळत नव्हता.

या समस्येकडे अन्याय निवारण समिती आणि नगरसेवकांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करत वीजवाहिनी कार्यान्वित केली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय कृष्णा पोवार, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी, लाईनमन संतोष डोंगरे, बाळकृष्ण कडुकर तसेच आजरा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले आणि आवश्यक तांत्रिक दुरुस्त्या पूर्ण करून वाहिनी चार्ज करण्यात आली.

तीन उपकेंद्रांना मोठा लाभ

मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी सुरू झाल्यामुळे खालील उपकेंद्रांच्या वीजपुरवठ्यात सुधारणा होणार आहे :

  • आजरा उपकेंद्र
  • गवसे उपकेंद्र
  • आंबोली उपकेंद्र

या उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या हजारो ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अधिक दर्जेदार, स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्येतही मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागरिकांकडून समाधान

१२ वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने आजरा, गवसे आणि आंबोली परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

तुळस गावात तलाठी नेमण्याची मागणी; जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांचे तहसीलदारांना निवेदन

Next Post

किल्ले पारगडावर ‘हेरिटेज रन’चा थरार; इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
5
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post
किल्ले पारगडावर ‘हेरिटेज रन’चा थरार; इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम

किल्ले पारगडावर ‘हेरिटेज रन’चा थरार; इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In