• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विहिरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; हतनुर गावावर शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :

कन्नड तालुक्यातील हतनुर येथे विहिरीत पडून एका ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हतनुर गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मृत व्यक्तीचे नाव किशोर भावराव काळे (वय ३७) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हतनुर शिवारातील (गट क्र. १३८) स्वतःच्या शेतामध्ये खराब झालेला विद्युत पंप विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक पाय घसरल्याने किशोर काळे विहिरीत पडले.

घटनेवेळी त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. वडील विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्याने आरडाओरड केल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि किशोर काळे यांना विहिरीतून बाहेर काढले.

त्यानंतर त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राजपूत यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. यावेळी परिचारिका राठोड आणि सावंत उपस्थित होत्या.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नारायण गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कैलास गिते पुढील तपास करीत आहेत.

किशोर काळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हतनुर गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

महाबळेश्वरात अनधिकृत व्यावसायिक वापरामुळे नागरिक त्रस्त; कारवाईची मागणी

Next Post

माहेरी आलेल्या विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post

माहेरी आलेल्या विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In