• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; चौकशी व कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी

पाथरी तालुक्यात विविध गावांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी परभणी तसेच उपविभागीय अधिकारी, पाथरी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

समितीचे तालुका अध्यक्ष मुस्तफा अन्सारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन सुरू असून काही ठिकाणी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना मुरूम उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात विशेषतः पाथरी शहरातील रेणापूर-बाबुळतारा मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. या परिसरात शनिवार व रविवारसारख्या शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित विभागांचे नियंत्रण कमी असल्याचा फायदा घेत नियमबाह्य उत्खनन आणि वाहतूक केली जात असल्याने या भागाची विशेष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. जमिनीची धूप, नैसर्गिक संसाधनांची हानी तसेच ग्रामीण भागातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनात महसूल व खनिकर्म विभागाकडून प्रभावी नियंत्रण आणि नियमित तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व मुरूम उत्खनन स्थळांची तातडीने तपासणी करून ज्या ठिकाणी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन झाले आहे किंवा विनापरवाना उत्खनन व वाहतूक सुरू आहे, त्या संबंधित व्यक्ती, कंत्राटदार आणि वाहनधारकांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच गौण खनिज नियमांनुसार कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी आणि सुट्टीच्या दिवशीही तपासणी व्यवस्था कार्यरत ठेवावी, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार पाथरी तसेच संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि अवैध उत्खननाविरोधात कोणती कारवाई करते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी व आरोग्य सुविधांसाठी बिरसा फायटर्सची निवेदने

Next Post

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : डॉ. देवराव होळी

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
10
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : डॉ. देवराव होळी

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In