• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात खुल्या जागेवर विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री; कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा नगरपरिषद हद्दीतील विविध सार्वजनिक व खुल्या जागांवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शाकाहारी, मांसाहारी नाश्ता, जेवण व इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विक्रेत्यांकडून अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयुर अनिल बाविस्कर यांनी केली आहे.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जात असून धूळ, प्रदूषण, माश्या आणि कीटकांमुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढला आहे.

तसेच, अनेक विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत आवश्यक असलेला एफएसएसएआय (FSSAI) परवाना किंवा नोंदणी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेची आवश्यक परवानगी न घेता व्यवसाय सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अस्वच्छ वातावरणात तयार व विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांना पोटाचे विकार, अन्न विषबाधा आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या परवान्यांची, स्वच्छतेच्या निकषांची आणि नियमांचे पालन होत आहे का याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त, जिल्हाधिकारी नंदुरबार, उपविभागीय अधिकारी शहादा आणि मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Previous Post

शहादा एस.टी. डेपोत वाहकाची दादागिरी; ७५ वर्षीय प्रवाशाला भर उन्हात बसमधून उतरवले, प्रवाशांत संताप

Next Post

शहादा पालिकेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘नवीन प्रवेश उत्सव’ उत्साहात; विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
6
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
15
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
3
Next Post

शहादा पालिकेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘नवीन प्रवेश उत्सव’ उत्साहात; विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In