• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळदच्या तलाठ्याचा मनमानी कारभार? मूळ शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
441
VIEWS
Ad 1

मळद (दौंड) : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील मळद येथील तलाठी मानसी मोहटकर यांच्या विरोधात एका शेतकऱ्याने गंभीर आरोप करत दौंड तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पदाचा गैरवापर करून नियमांना बगल देत एका शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

नेमके प्रकरण काय?

मळद येथील शेतकरी संतोष कुदळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तलाठी मानसी मोहटकर यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी १५५ दुरुस्तीच्या नावाखाली कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता कुदळे यांचे नाव मूळ हक्कातून कमी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर कुदळे यांनी तलाठी कार्यालयात धाव घेतली असता, “झालेली चूक दुरुस्त करून देते,” असे आश्वासन देण्यात आले.

मात्र, गेल्या चार वर्षांपासून तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लाचखोरीचाही संशय व्यक्त

संतोष कुदळे यांनी आपल्या निवेदनात संबंधित फेरफार प्रक्रियेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मूळ हक्कातील बदल करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे काही पुरावेही त्यांनी तहसीलदारांकडे सादर केल्याचे सांगितले आहे.

कारवाईची मागणी

या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित तलाठ्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संतोष कुदळे यांनी केली आहे.

दरम्यान, शासकीय कामकाजात पारदर्शकतेचे दावे केले जात असताना अशा प्रकारच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता या तक्रारीवर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मळद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित; विशेष ग्रामसभेत रोटेशन प्रक्रिया पार पडली

Next Post

कणकवलीत ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’चे भूमिपूजन; १ कोटींच्या निधीतून साकार होणार उद्यान

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

कणकवलीत ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’चे भूमिपूजन; १ कोटींच्या निधीतून साकार होणार उद्यान

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In