• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय देणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

देवळी येथे पालकमंत्र्यांच्या जनसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राप्त तक्रारींवर महिनाभरात कारवाई करण्याचे निर्देश

प्रतिनिधी : वर्धा

केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून, देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारल्याशिवाय येथून हलणार नाही, तसेच मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. “इतकी वर्षे काम करूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक समस्या घेऊन प्रशासनासमोर येत असतील, तर ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, तसेच आज प्राप्त झालेली सर्व निवेदने एका महिन्याच्या आत निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पात्र नागरिकांना पट्टे वाटप करावे – आ. राजेश बकाने

आमदार राजेश बकाने यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमण नियमन आणि झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्याची मागणी त्यांनी केली.

२०११ पूर्वीच्या पुराव्यांसह पात्र असलेल्या नागरिकांना पुढील दोन महिन्यांत पट्टे देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पालकमंत्र्यांचा नागरिकांशी आत्मीय संवाद

जनसंवाद कार्यक्रमात २४ शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित निवेदने व तक्रारी थेट पालकमंत्र्यांकडे सादर केल्या. पालकमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

विविध योजनांच्या लाभांचे वाटप

कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये :

  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील १६ लाभार्थ्यांना मदत
  • १२ जणांना नवीन शिधापत्रिका
  • १४८ लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमानुकूल पट्टे
  • ५० जणांना घरकुलाच्या चाव्या
  • कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ५ लाभार्थ्यांना तूर वाटप
  • २ जणांना पॅक हाऊस अनुदान
  • १० लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वितरण

यावेळी नागरिकांनी जनसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

Next Post

रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In