• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

नगरपरिषद व भूमी अभिलेख विभागाची संयुक्त बैठक

महिनाभरात भूखंडधारकांना भोगवटदार वर्ग-1 पत्रके देण्याचे निर्देश

वर्धा, दि. १३ (जिमाका):
वर्धा शहरातील रामनगर परिसरातील लिजधारकांचे भूखंड शासनाने फ्री-होल्ड केल्यानंतरही अनेक नागरिकांना अद्याप मालकी हक्काची मालमत्ता पत्रके मिळाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत नगरपरिषद, महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वर्धा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मुख्याधिकारी विजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, भूमी अभिलेख उपअधीक्षक सुनील बन तसेच रामनगर येथील फ्री-होल्डधारक नागरिक उपस्थित होते.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, रामनगर परिसरातील अनेक नागरिक अनेक वर्षांपासून लिज जमिनीवर वास्तव्यास आहेत. या नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर शासनाने संबंधित भूखंड फ्री-होल्ड करण्याचा निर्णय घेतला असून नगरपरिषदेकडून त्यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत.

फ्री-होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नागरिकांना मालकी हक्काची मालमत्ता पत्रके मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने येत्या एका महिन्यात सुमारे ३५० भूखंडधारकांना भोगवटदार वर्ग-1 चे मालमत्ता पत्रके वितरीत करावीत, तसेच उर्वरित प्रकरणे पुढील दोन महिन्यांत निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी रामनगर परिसरातील नागरिकांच्या विविध अडचणी तत्काळ सोडवण्याच्या सूचनाही नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर गती मिळाल्याने रामनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय देणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Next Post

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
20
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
23
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In