• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

“प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा पाठिंबा आणि कुटुंबाचे सहकार्य यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात,” असे प्रतिपादन Shankarbaba Papalkar यांनी केले. ते वर्धा सोशल फोरमच्या वतीने आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून गोपालन आणि बकरी पालनाचा अवलंब करावा, असेही आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद वर्धाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे या होत्या. त्यांनी वर्धा सोशल फोरमच्या उपक्रमाचे कौतुक करत पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वैशाली शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, यांनी शेतकऱ्यांना घन कपाशी लागवड तसेच पेरणीबाबत मार्गदर्शन करत “यंदा पेरणीची घाई करू नये,” असा सल्ला दिला.

यावेळी व्यासपीठावर वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे आणि सचिव अविनाश सातव उपस्थित होते.

कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सौ. मनीषाताई मेघे यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच पद्मश्री पापळकर यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी कु. गांधारी हिने आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार महिलांना क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. चेतना सवाई, श्रीमती तबस्सुम आझमी, कु. कांचन रघटाटे आणि सौ. अश्विनी रवी काळे यांचा समावेश होता.

वर्धा सोशल फोरमकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने यावेळी शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवीभाऊ शेंडे, शैलेंद्रजी तप्तरी, चंदूभाऊ ठक्कर, सुनीलजी तापडिया यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. तसेच शिव प्रतिष्ठानच्या सदस्यांनीही विशेष योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी पुरोहित यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्यामभाऊ परसोडकर यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Next Post

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
20
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
23
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In