• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

वर्धा जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि मद्यधुंद वाहनचालकांवर आळा बसावा यासाठी वर्धा पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

RelatedPosts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक Saurabh Kumar Agrawal आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दि. १४ जून २०२६ रोजी वर्धा शहरातील इतवारा चौक परिसरात मार्शल पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी हिरो स्प्लेंडर (क्रमांक MH 32 AB 0238) या दुचाकीची तपासणी केली. चालक जितेंद्र दादाराव पालेकर (वय ५०, रा. चंद्रपूर, सध्या सिध्दार्थ सावंगी मेघे, वर्धा) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक नियंत्रण शाखेत ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली असता त्याच्या शरीरात ३५.२ mg अल्कोहोल आढळून आले. त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर दि. १५ जून २०२६ रोजी पुन्हा विशेष नाकाबंदी दरम्यान ग्लॅमर (क्रमांक MH 32 AU 0109) या दुचाकी चालकाची तपासणी करण्यात आली. अमरदीप नागोराव हातमोडे (वय ४०, रा. पालोती, ता. जि. वर्धा) हा चालकही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळले. त्याच्या शरीरात ३९.३ mg अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. त्याच्यावरही मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

दोन्ही चालकांचे वाहन परवाने जप्त करून त्यांचे लायसन्स निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या १५५ कारवाया करण्यात आल्या असून ५३ लायसन्स निलंबन प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर १६२४ कारवाया तर अवैध प्रवासी वाहतुकीच्या ९७ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहन चालविताना मद्यपान टाळावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.

Previous Post

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Related Posts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली
Blog

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026
0
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
3
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
7
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
6
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
40
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
29
Next Post

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

ताज्या बातम्या

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In