• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; कुंकवात पाय बुडवून शाही स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

पानचिंचोली प्रतिनिधी :
लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांची पाऊलं पडतायत शिक्षणाकडे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच नववधूप्रमाणे कुंकवात पाय बुडवून त्यांचे शाही स्वागत करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच शिक्षकांनी त्यांचे औक्षण केले. कुंकवाच्या पावलांनी स्वागत करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख पांडुरंग मस्के यांनी दिली.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

विविध उपक्रमांनी परिसर गजबजला

जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

तसेच सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण होळीकर यांनी जिल्हा परिषद शाळा, पानचिंचोलीला प्रिंटर भेट देऊन शाळेच्या डिजिटल उपक्रमांना हातभार लावला.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ज्ञानोबा साबणे, ढोके काकासाहेब, भोसले झुंबर, जागले शारदा, रणखांब अयोध्या यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण रणदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीव राजमाने यांनी केले.

या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना दृढ झाल्याचे दिसून आले.

Previous Post

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Next Post

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In