• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंढरपूर-कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
92
VIEWS
Ad 1

पंढरपूर प्रतिनिधी :

पंढरपूर-कुर्डूवाडी रोडवरील भाबुळगाव येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH 26 BE 3693 आणि मोटारसायकल क्रमांक MH 13 AL 0363 यांच्यात हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अंबादास बबन पाटोळे (वय 35) असे असून तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे.

अंबादास पाटोळे हे आपल्या घराजवळून गावाकडे जात असताना भरधाव आणि ओव्हरलोड ट्रकने त्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक रस्त्यालगतच्या शेतात जाऊन बंद पडला. चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत टाहो फोडला. परिसरात मोठी गर्दी जमली होती. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव रंधवे तसेच वाडदेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी : प्राजक्ता पाटील-साळुंखे

Next Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांचा विरोध; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
5
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
11
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
8
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
7
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
16
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
20
Next Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांचा विरोध; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In